World Cup 2019 : धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमधून धोनीने याआधीच निवृत्ती जाहीर केली आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडकामध्ये सध्या भारतीय संघ जोरदार फॉर्मात आहे. भारताने बांगलादेशला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, विश्वकरंडकानंतर भारताला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमधून धोनीने याआधीच निवृत्ती जाहीर केली आहे.

विश्वकरंडक 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वकरंडक असेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या विश्वकरंडकामध्ये त्याचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. तसेच, त्याच्यावर चोहोबाजूंनी टीकाही होताना पाहायला मिळत असून तो निवृत्ती जाहीर करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. तसेच धोनीचे वयही सध्या 37 वर्षे आहे.

दरम्यान धोनीवर अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरोधात धिम्या गतीनं फलंदाजी केल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याच्यावर टीका केली होती. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्यामुळं धोनीवर सतत टीका केली जात आहे. म्हणून धोनी निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


​ ​

संबंधित बातम्या