प्रीमियर विजेते सिटी चॅंपियन्स लीगमधून बाद?

वृत्तसंस्था
Wednesday, 15 May 2019

आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे. 

लंडन : आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे. 

सिटीने आर्थिक नियमनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी जर्मनीतील डेर स्पिएगेल या मासिकाने दिले होते. त्यानुसार यूएफा आणि प्रीमियर लीगने चौकशी सुरू केली होती. यूएफाच्या आर्थिक नियमन मंडळाने यासाठी चौकशी समिती नेमली होती. त्यानी सिटीच्या आर्थिक व्यवहाराचा कसून अभ्यास केला. त्यात खर्च कपातीचे नियम सिटीने पाळले नसल्याचे लक्षात आले असल्याचे वृत्त आहे. 

बेल्जियमचे माजी पंतप्रधान येवेस लितर्मी अध्यक्ष असलेली समिती अंतिम निर्णय घेईल; पण याबाबतचे नियम बघितल्यास किमान एका वर्षाची चॅंपियन्स लीगवर बंदी येऊ शकेल. आता ही बंदी आगामी मोसमात असेल की पुढील मोसमात, याबाबत नेमके सांगणे अवघड आहे. चॅंपियन्स लीगचा नवा मोसम जूनमध्ये सुरू होईल. त्यामुळे तातडीने निर्बंध अंमलात येण्याची शक्‍यता कमी असल्याचेही सांगितले जात आहे. 

आम्ही कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही, असे सिटीने मार्चमध्ये सांगितले होते. त्याचवेळी कोणत्याही चौकशीस तयार असल्याचेही सांगितले होते. अर्थात, चार वर्षांपूर्वी खेळाडूंच्या खरेदी रकमेवरील मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांना 6 कोटी युरोचा दंड झाला होता. 

इंटर मिलानच्या पात्रतेच्या आशा कायम 
रोम : इंटर मिलानने चिएवोचा 2-0 असा पाडाव करीत सिरी ए या इटालियन साखळीत तिसरा क्रमांक मिळवला, त्यामुळे त्यांच्या चॅंपियन्स लीग पात्रतेच्या आशा कायम आहेत. इंटरने चौथ्या क्रमांकावरील ऍटलांटास एका गुणाने मागे टाकले आहे.

एसी मिलान आणि रोमा हे चौथ्या क्रमांकावरील ऍटलाटांपासून तीन गुणांनी दूर आहेत, तर तुरीन पाच गुणांनी. इंटर नापोलीस हरवून चॅंपियन लीग पात्रता निश्‍चित करू शकेल. 

आयपीएल असो वा वर्ल्ड कप.. प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा!


​ ​

संबंधित बातम्या