वर्ल्ड पोलिस गेम्स स्पर्धेत मंदार दिवसेला आठ सुवर्ण  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

कोल्हापूर -  चेंगडू (चीन) येथे झालेल्या अठराव्या वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स स्पर्धेत आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मंदार दिवसे याने आठ सुवर्ण, प्रत्येकी एक रौप्य व कास्यपदक पटकाविले.

कोल्हापूर -  चेंगडू (चीन) येथे झालेल्या अठराव्या वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स स्पर्धेत आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मंदार दिवसे याने आठ सुवर्ण, प्रत्येकी एक रौप्य व कास्यपदक पटकाविले.

मंदार याने २०० मीटर वैयक्तिक मिडले, २००, ४००, ८००, १५०० मीटर फ्री स्टाईल, २ मैल ओपन वॉटर स्विमिंग, २५.७५ किलोमीटर टायथ्लॉन रिले, ४ बाय ५० मिडले रिलेत सुवर्ण, ४ बाय ५० फ्री स्टाईल रिले व ४ बाय ५० मिक्‍स्ड फ्री स्टाईल रिलेत कास्यपदक मिळवले. तो सध्या सीमा सुरक्षा दलात निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. 

​ ​

संबंधित बातम्या