कुमार हॉकी संघाचा मनदीप मोर कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

- मनदीप मोर याची भारतीय कुमार हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.

-  हा संघ सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा जोहोर बाहरू (मलेशिया) येथे 12 ते 19 ऑक्‍टोबरदरम्यान होईल

मुंबई - मनदीप मोर याची भारतीय कुमार हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. हा संघ सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा जोहोर बाहरू (मलेशिया) येथे 12 ते 19 ऑक्‍टोबरदरम्यान होईल. 
भारतीय कुमार संघासमोर या स्पर्धेत मलेशिया, न्यूझीलंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनचे आव्हान असेल. संजय उपकर्णधार असलेल्या या संघात दिनाचंद्र सिंग आणि शारदानंद तिवारी यांची नव्याने निवड झाली आहे. 
भारतीय संघास जूनमध्ये माद्रिदला झालेल्या आठ देशांच्या स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यापेक्षा सरस कामगिरी नक्कीच होईल, याची ग्वाही भारतीय मार्गदर्शक बी. जे. करिअप्पा यांनी दिली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, ब्रिटनचे आव्हान असेल आणि तो अनुभव मोलाचा असेल. ""संघाने कसून सराव केला आहे. त्यांचे कौशल्य उंचावले आहे. मात्र, त्यांनी सरावात आत्मसात केलेल्या गोष्टी प्रत्यक्ष स्पर्धेत अमलात आणण्याची गरज आहे,'' असे मार्गदर्शकांनी सांगितले.  
 


​ ​

संबंधित बातम्या