कुमार हॉकी संघाचा मनदीप मोर कर्णधार

वृत्तसंस्था
Wednesday, 15 May 2019

मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.

मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे. 

भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार असतानाच ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत नेदरलॅंड्‌स, बेल्जियम, ब्रिटन, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यजमान स्पेन तसेच भारताचा सहभाग आहे. 

भारतीय संघातील काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय लढतींचा अनुभव आहे. या स्पर्धेतील प्रतिस्पर्धी लक्षात घेतल्यास खेळाडूंचा चांगलाच कस लागेल. या स्पर्धेद्वारे दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक कुमार स्पर्धेची पूर्वतयारीही सुरू होईल, असे हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टर डेव्हीड जॉन यांनी सांगितले. 

भारतीय संघ - गोलरक्षक : प्रशांत कुमार चौहान, पवन. बचावपटू : मनदीप मोर (कर्णधार), प्रदीप लाक्रा, संजय, आकाशदीप सिंग धाकटा, सुमन बेके (उपकर्णधार), परमप्रीत सिंग. मध्यरक्षक : यशदीप सिवाच, विष्णूकांत सिंग, रवीचंद्रसिंग मोईरांगथेन, मनिंदरसिंग, विशाल अंतिल. आक्रमक : अमनदीपसिंग, राहुलकुमार राजभार, शिवम आनंद, सुदीप चिरमाको, प्रभज्योतसिंग. 

आयपीएल असो वा वर्ल्ड कप.. प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा!


​ ​

संबंधित बातम्या