कुकच्या द्विशतकामुळे व्हाइटवॉश टळण्याची चिन्हे 

पीटीआय
Thursday, 28 December 2017

मेलबर्न : ऍशेस यापूर्वीच गमावलेल्या इंग्लंडला प्रतिष्ठेच्या मालिकेत व्हाइटवॉश टाळता येईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ऍलिस्टर कुकने नाबाद द्विशतकी खेळी केली. इंग्लंडच्या खात्यात 164 धावांची आघाडी जमली आहे. 

कुक दिवसअखेर 244 धावांवर नाबाद होता. इंग्लंडने 9 बाद 491 धावा केल्या होत्या. कर्णधार ज्यो रूट याने मात्र निराशा केली. तो काल 49 धावांवर नाबाद होता. आज त्याने अर्धशतक पूर्ण केले; पण चांगल्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्याला येणारे अपयश कायम राहिले. तो 61 धावांवर बाद झाला. कमिन्सने त्याला बाद केले. 

कुकने एमसीजीवर (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड) परदेशी फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक खेळी नोंदविली. यापूर्वी 1984 मध्ये व्हिव रिचर्डस यांनी 208 धावा केल्या होत्या. इंग्लंडतर्फे याआधीचा 200 धावांचा उच्चांक वॉली हॅमंड यांनी 1928 मध्ये नोंदविला होता. कुकचे हे 32वे कसोटी शतक आहे. त्याने पाचवे द्विशतक काढले. 294 धावा त्याच्या सर्वोच्च आहेत. त्याला आजही नशिबाची साथ मिळाली. स्लिपमध्ये प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव स्मिथने त्याचा झेल सोडला. तेव्हा कुक 153 धावांवर होता. 

स्टुअर्ट ब्रॉडने कुकला चांगली साथ दिली. या जोडीने नवव्या विकेटसाठी 100 धावांची भर घातली. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 327 
इंग्लंड : पहिला डाव : 144 षटकांत 9 बाद 491
(ऍलिस्टर कुक खेळत आहे 244-409 चेंडू, 27 चौकार, ज्यो रूट 61, जॉनी बेअरस्टॉ 22, ख्रिस वोक्‍स 26, स्टुअर्ट ब्रॉड 56-63 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, जॉश हेझलवूड 3-95, नेथन लायन 3-109, पॅट कमिन्स 3-117).

​ ​

संबंधित बातम्या