नव्या वर्षात नंबर वन व्हायचेय : सिंधू
नवी दिल्ली : भारताची नवी फुलराणी पी. व्ही. सिंधूने येत्या वर्षात जागतिक बॅडमिंटनमध्ये नंबर एकचा क्रमांक मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे, पण त्यासाठी आपले लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिले तर निश्चितच जागतिक क्रमवारीत आपण पहिले येऊ, असा विश्वास तिने व्यक्त केला.
सरत्या मोसमात सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. या स्थानावर ती दोन महिने होती. सध्या मी तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या मोसमात मला पहिला क्रमांक मिळवायचा आहे, पण हे सर्व पुढील स्पर्धांवर अवलंबून आहे.

चांगला खेळ करत राहिले तर आपोआप मानांकन सुधारेल. बॅडमिंटन लीगमध्ये पिछाडीवरून बाजी मारून आपल्या चेन्नई स्मॅशर्स संघाला मुंबई रॉकेट्सविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर सिंधू बोलत होती.
22 वर्षीय सिंधूने सरत्या मोसमात सय्यद मोदी स्पर्धा, इंडियन ओपन, कोरिया ओपन स्पर्धा जिंकल्या; तर जागतिक अजिंक्यपद, हॉंगकॉंग ओपन आणि दुबई सुपर सीरिजमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिलांचे सामनेही आता प्रदीर्घकाळ रंगतात असे सिंधूने सांगितले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नोझोमी ओकुहाराविरुद्धचा माझा अंतिम सामना ज्या प्रकारे लांबला, त्यानंतर आता महिलांचेही सामने अधिक काळ चालत आहेत, असे सिंधूचे म्हणणे आहे. त्याअगोदर मी एवढा अधिक काळ कोणताही सामना खेळले नव्हते, पण त्या अंतिम सामन्यानंतर महिलांचे सामने कमीत कमी दीड तास आणि कधी कधी त्यापेक्षाही अधिक काळ रंगत आहेत. माझ्या मते प्रत्येक गेम 40 मिनिटांपेक्षा अधिक होत आहे. ओकुहारा, ताय त्झु यिंग असे स्पर्धक समोर असल्यावर सामन्यांचा कालावधी वाढणारच, असे सिंधू म्हणते.
पुढील मोसमातील इंडियन ओपन स्पर्धा जानेवारीतच अखेरच्या आठवड्यात होणार आहे. यासंदर्भात विचारले असता सिंधूने सांगितले की, प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या स्पर्धांचा कार्यक्रम असा बदलत असतो. नव्या स्पर्धांचा समावेश करताना असे बदल घडत असतात. तारखा आणि वेळाबदलाचा माझ्यावर परिणाम होणार नाही.
प्रेक्षकांमधून सिंधू... सिंधू असा जयघोष होत असतो तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षांचे माझ्यावर दडपण येत नाही. भारतात खेळत असताना प्रेक्षकांमधून असे प्रोत्साहन मिळते तेव्हा फार उत्साह वाढत असतो. नुकतीच मी दुबई येथे खेळले तेव्हाही मला प्रेक्षकांकडून भरघोस पाठिंबा मिळाला होता. अपेक्षा तर वेळोवेळी असणारच; परंतु आपला सर्वोत्तम खेळ करणे महत्त्वाचे असते, मी या प्रकारचे कोणतेही दडपण घेत नाही.
- पी. व्ही. सिंधू