'डोपिंग'मध्ये दोषी आढळल्याने युसूफ पठाणवर बंदी! 

वृत्तसंस्था
Tuesday, 9 January 2018

नवी दिल्ली : उत्तेजकद्रव्य सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाच महिन्यांची बंदी घातली. गेल्या वर्षी 15 ऑगस्टपासून ही बंदी लागू झाली आहे. याचाच अर्थ, येत्या 14 जानेवारीपर्यंत युसूफवर बंदी असेल. 

नुकत्याच संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेत युसूफ पठाण बडोद्याच्या संघाकडून खेळला नव्हता. 'युसूफची संघात निवड करू नये' अशा आशयाची सूचना 'बीसीसीआय'ने बडोदा क्रिकेट संघटनेला केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर 'बीसीसीआय'ने पत्रक प्रसिद्ध करून युसूफवरील कारवाईची माहिती दिली. 

जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संघटनेच्या (वाडा) नियमांनुसार ही कारवाई झाली आहे. यामध्ये हस्तक्षेप करण्याची मुभा 'बीसीसीआय'ला नाही. 'गेल्या वर्षी 16 मार्च रोजी 'अँटी डोपिंग' मोहिमेअंतर्गत युसूफची चाचणी झाली होती. त्यावेळी युसूफ देशांतर्गत ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये सहभागी झाला होता. युसूफने उत्तेजक द्रव्य घेतल्याची माहिती या चाचणीमध्ये समोर आले. त्यानुसार, गेल्या वर्षी 27 ऑक्‍टोबर रोजी युसूफची चौकशी झाली. त्यामध्ये त्याने चूक कबुल केली. बंदी असलेल्या उत्तेजक द्रव्याचा समावेश असलेले औषध चुकून घेण्यात आले, असे युसूफने सांगितले. हे औषध कामगिरी उंचावण्यासाठी नसून दुखापतीवर उपचारादरम्यान घेण्यात आले होते. त्यामुळे चौकशी समितीचे युसूफच्या उत्तराने समाधान झाले,' असे 'बीसीसीआय'च्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

35 वर्षीय युसूफ पठाणने आतापर्यंत 57 एकदिवसीय आणि 22 ट्‌वेंटी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 'आयपीएल'मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांकडूनही त्याने मोलाची कामगिरी केली आहे. यापूर्वी मार्च 2012 मध्ये युसूफ भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

​ ​

संबंधित बातम्या