दक्षिण आफ्रिकेची प्रथम फलंदाजी; बुमराहचे पदार्पण; रहाणे संघाबाहेर 

वृत्तसंस्था
Friday, 5 January 2018

केप टाऊन : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या जसप्रित बुमराहला आज (शुक्रवार) कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. 

खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारताने अंतिम संघात तीन वेगवान गोलंदाज निवडले आहेत. तसेच, अष्टपैलू हार्दिक पांड्याही संघात असल्याने वेगवान गोलंदाजीचा आणखी एक पर्याय उपलब्ध असेल. आर. आश्‍विनच्या रुपाने एकमेव फिरकीपटू संघात आहे. गेल्या काही सामन्यांपासून सूर हरपलेल्या अजिंक्‍य रहाणेला कसोटी संघातील स्थानही गमवावे लागले आहे. त्याच्याजागी रोहित शर्माला संधी मिळाली आहे. 

दक्षिण आफ्रिकेनेही या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनाच पसंती दिली आहे. कागिसो रबाडा, व्हरनॉन फिलँडर, मॉर्ने मॉर्केल आणि डेल स्टेन असे चार दर्जेदार वेगवान गोलंदाज त्यांच्या संघात आहेत. 

भारतीय संघ : 
शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, आर. आश्‍विन, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमराह. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ : 
डीन एल्गर, एडन मार्कराम, हाशिम आमला, एबी डिव्हिलर्स, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), व्हरनॉन फिलँडर, केशव महाराज, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, कागिसो रबाडा.

​ ​

संबंधित बातम्या