'ज्युनिअर' राहुल द्रविडनेही झळकाविले शतक!

वृत्तसंस्था
Wednesday, 10 January 2018

बंगळूर : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगाही आता वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकू लागला आहे. कर्नाटक क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत राहुल द्रविड यांचा मुलगा समित याने दीडशे धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

विशेष म्हणजे, राहुल द्रविड यांचे संघ सहकारी आणि माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांचा मुलगा आर्यन यानेही याच सामन्यात 154 धावा फटकाविल्या. समित द्रविड आणि आर्यन जोशी यांच्या भागीदारीमुळे त्यांच्या मल्ल्या आदिती इंटरनॅशनल स्कूल या संघाला 50 षटकांत पाच बाद 500 धावांचा पल्ला गाठता आला. प्रतिस्पर्धी विवेकानंद स्कूलच्या संघाला केवळ 88 धावाच करता आल्या. मल्ल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलने या सामन्यात 412 धावांनी विजय मिळविला. 

अर्थात, क्रिकेटमुळे चर्चेत येण्याची ही समितची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही समितने कर्नाटकमधील 14 वर्षांखालील संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दोन वर्षांपूर्वी समितने बंगळूर युनायटेड क्रिकेट क्‍लबकडून खेळताना 12 चौकारांसह 125 धावांची खेळी केली होती. 2015 मध्ये झालेल्या 12 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत समितला 'सर्वोत्तम फलंदाज' हा पुरस्कारही मिळाला होता. त्या स्पर्धेत त्याने शाळेचे प्रतिनिधित्व करताना सलग तीन सामन्यांत अर्धशतके झळकाविली होती. 

राहुल द्रविड यांचा उद्या (ता. 11) 44 वा वाढदिवस आहे. राहुल सध्या भारताचे 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक आहेत. दीर्घकाळ कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलेले सुनील जोशी सध्या बांगलादेशच्या संघाचे फिरकी गोलंदाजीचे सल्लागार आहेत.

​ ​

संबंधित बातम्या