क्रिकेट: 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था
Friday, 19 January 2018

बे ओव्हल (न्यूझीलंड) : राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत आज (शुक्रवार) झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने झिंबाब्वेला 154 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे लक्ष्य 21.4 षटकांत पूर्ण करत विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. 

यंदाच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. किंबहुना, प्रत्येक सामन्यात भारताचे गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या तिघांचीही कामगिरी अपेक्षेनुसारच होत आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यंदाच्या स्पर्धेत भारत संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 

डावखुरा फिरकी गोलंदाज अनुकूल रॉयने 20 धावा देत चार गडी बाद करून झिंबाब्वेला अडचणीत आणले. अभिषेक शर्मा आणि मध्यमगती गोलंदाज अर्शदीप सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले. शिवम मावी आणि रियान पराग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 

155 धावांचे लक्ष्य पार करताना सलामीवीर हाविक देसाई आणि शुभमान गिल यांनी झिंबाब्वेच्या गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजविले. या सामन्यामध्ये भारताने सलामीला नवी जोडी पाठवून प्रयोग केला. कर्णधार पृथ्वी शॉने मधल्या फळीत खेळणे पसंत केले; पण देसाई-गिल यांच्या धडाक्‍यामुळे इतर फलंदाजांना फलंदाजीची वेळच आली नाही. 

संक्षिप्त धावफलक 
झिंबाब्वे : 48.1 षटकांत सर्वबाद 154 

वेस्ली मधिवेरे 30, मिल्टन शुम्बा 36, लियाम रोचे 31 
अनुकूल रॉय 4-20, अभिषेक शर्मा 2-22, अर्शदीप सिंग 2-10, शिवम मावी 1-30, रियान पराग 1-17 
भारत : 21.4 षटकांत 155 
हाविक देसाई नाबाद 56, शुभमान गिल नाबाद 90 

​ ​

संबंधित बातम्या