दक्षिण आशियाई जलतरण स्पर्धा : पुण्याच्या मिहीरला दोन पदके

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

13 व्या दक्षिण आशियाई जलतरण स्पर्धेत पुण्याच्या मिहीर आम्ब्रे याने दोन पदके मिळविण्याची कामगिरी केली आहे.

पुणे : 13 व्या दक्षिण आशियाई जलतरण स्पर्धेत पुण्याच्या मिहीर आम्ब्रे याने दोन पदके मिळविण्याची कामगिरी केली आहे.

नेपाळमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मिहीरने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य, तर 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात ब्राँझपदक मिळविले आहे. त्याने कारकिर्दीत दुसऱ्यांदा रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. 

मिहीर हा पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तो मयुर कॉलनीतील चॅम्पियन क्लबमध्ये 2014 पासून प्रशिक्षण घेत आहे. त्याने 2017 मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते.


​ ​

संबंधित बातम्या