World Cup 2019 : पाकने चँपियन्स ट्रॉफीपासून प्रेरणा घ्यावी : आमीर 

वृत्तसंस्था
Saturday, 1 June 2019

पाकिस्तानला त्या स्पर्धेत सलामीला बर्मिंगहॅममध्ये भारताविरुद्ध 124 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतालाच अंतिम फेरीत 180 धावांनी गारद करीत पाकिस्तानने विजेतेपद खेचून आणले होते.

नॉटिंगहॅम : वेस्ट इंडीजविरुद्ध सलामीला झालेल्या पराभवातून सावरण्यासाठी पाकिस्तानने 2017 मधील चॅंपियन्स ट्रॉफीतील यशापासून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन डावखुरा वेगवान गोलंदाज महंमद आमीर याने केले. 

तीन विकेट घेत आमीरने एकट्याने पाकला दिलासा दिला. तो म्हणाला की, संघाने आता पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चॅंपियन्स ट्रॉफीत दाखविला तसा फॉर्म मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाने खेळावे लागेल. 

पाकिस्तानला त्या स्पर्धेत सलामीला बर्मिंगहॅममध्ये भारताविरुद्ध 124 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतालाच अंतिम फेरीत 180 धावांनी गारद करीत पाकिस्तानने विजेतेपद खेचून आणले होते. त्या वेळीसुद्धा आम्ही पहिला सामना हरलो होतो, पण त्यानंतर फॉर्म कमावला होता. आम्हाला हताश होऊन चालणार नाही, असेही त्याने सांगितले. 

विंडीजविरुद्धच्या कामगिरीबद्दल तो म्हणाला की, गोलंदाज विकेट मिळवितो तेव्हा त्याचा आत्मविश्‍वास केवळ वाढतोच. माझ्या बाबतीत अलीकडच्या काळात विकेट मिळणेच थांबले होते. आता मी पुन्हा विकेट मिळवू लागलो आहे आणि मी मुख्य गोलंदाज असल्यामुळे मी विकेट घेऊ शकलो तर ते संघासाठी फायदेशीर ठरते. 


​ ​

संबंधित बातम्या