दीपक कोनाळेने केले एल्ब्रूस सर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 July 2019

युरोप खंडातील सर्वांत उंच एल्ब्रुस शिखर सर करून गिर्यारोहक दीपक कोनाळेने 6.80 मीटर लांबीचा व 3.60 मीटर उंचीचा तिरंगा फडकाविला. या विक्रमाची नोंद "हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड'मध्ये करण्यात आली.

पुणे : युरोप खंडातील सर्वांत उंच एल्ब्रुस शिखर सर करून गिर्यारोहक दीपक कोनाळेने 6.80 मीटर लांबीचा व 3.60 मीटर उंचीचा तिरंगा फडकाविला. या विक्रमाची नोंद "हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड'मध्ये करण्यात आली.

पत्रकार परिषदेत ​त्याने सांगितले की, मी राष्ट्रगीत गायिले. हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, असा माझा संदेश आहे. गेल्या वर्षी मी आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर केले होते. यंदा एक जुलैला एल्ब्रूसची चढाई सुरू केली. एल्ब्रुसची उंची 5642 मीटर आहे. यानंतरची मी दक्षिण अमेरिकेतील माउंट ऍकांगूआ मोहीम आखली आहे. 

गिर्यारोहकासाठी मोहीम सर करण्यापेक्षाही "आर्थिक साहाय्य' हे सगळ्यात मोठे आव्हान असते. याकरिता तेलंगण, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सरकारकडून आर्थिक साहाय्य दिले जाते; परंतु गिर्यारोहणासाठी महाराष्ट्र सरकारकडून कुठलाच पाठिंबा मिळत नाही. 
- दीपक कोनाळे, गिर्यारोहक 


​ ​

संबंधित बातम्या