World Cup 2019 : रनआऊटने सुरवात, रनआऊटने करिअरचा शेवट?

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

धोनीच्या करिअरच्या सुरवातही धावबाद होऊनच झाली होती आणि आता आजचा सामना जर त्याचा अखेरचा असला तरी आजच्या सामन्यातही तो धावबाद होण्याचा योगायोग आज घडला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीत पराभव झाल्याने त्यांचे आणि त्यांच्यासह सर्व भारतीयांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न भंगले. 240 धावांचा पाठलाग करताना रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने सगळे फलंदाज बाद झाले तरी त्यांनी सामन्यात जान आणली. मात्र धोनी अखेर धावबाद झाला. 

धोनीच्या करिअरच्या सुरवातही धावबाद होऊनच झाली होती आणि आता आजचा सामना जर त्याचा अखेरचा असला तरी आजच्या सामन्यातही तो धावबाद होण्याचा योगायोग आज घडला आहे. 

धोनीने 23 डिसेंबर 2004मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात धोनी भोपळाही न करता धावबाद झाला होता. त्याला खालिद मसूदने धावबाद केले होते. आजच्या सामन्यात त्याला मार्टीन गुप्टिलने धावबाद केले.  

​ ​

संबंधित बातम्या