World Cup 2019 : हिटमॅन रोहितला भिती होम मिनिस्टरची

मुकुंद पोतदार
Wednesday, 19 June 2019

वर्ल्ड कपमध्ये तुफानी फलंदाजी करीत असलेल्या रोहित शर्माच्या धडाकेबाज शैलीचे पैलू इंग्लंडमधील मैदानांवर प्रकट होत आहेत. दुसरीकडे मैदानाबाहेर स्वभावाचे पैलू सुद्धा उलगडत आहेत.​

वर्ल्ड कप : वर्ल्ड कपमध्ये तुफानी फलंदाजी करीत असलेल्या रोहित शर्माच्या धडाकेबाज शैलीचे पैलू इंग्लंडमधील मैदानांवर प्रकट होत आहेत. दुसरीकडे मैदानाबाहेर स्वभावाचे पैलू सुद्धा उलगडत आहेत.

पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील अशा प्रश्नावर कधी काळी त्यांचा प्रशिक्षक झालो तर बघू, आत्ता काय बोलणार असे हजरजबाबी उत्तर त्याने दिले होते. मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे कोणतेही चेंडू कसेही पुल करणारा, त्यांची विक्रमी धुलाई करणाऱ्या रोहितला पत्नी रितीका हिचा मात्र दबदबा जाणवतो हे दिसून आले.

आयपीएलमधील त्याच्या टीमचे एक ट्वीट आणि त्यावरील रोहितची कमेंट बघता हेच दिसून येईल. @mipaltan या नावाने मुंबई इंडियन्सचे ट्वीटर हँडल आहे. mumbaiindians.com या  संकेतस्थळावर या फ्रँचायजीच्या प्रतिनिधीने रोहित शर्मावर लेख लिहीला आहे. याची लिंक या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. जोडीला रोहित-रितीका आणि समायरा यांचा फोटो आहे.
 Happy Family Man, In-form Hitman असे या लेखाचे शिर्षक आहे. त्याची लिंक टाकताना रोहितला टॅग करण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडीया टीमने म्हटले आहे की, रोहितने जीवनात चांगला कालखंड निर्माण केल्याबद्दल मुलगी समायरा हिला श्रेय दिले.
त्यावर कमेंट करताना रोहितने आपला मिस्कील स्वभाव प्रदर्शित केला. त्याने म्हटले आहे की, हे जे काही (तुम्ही मंडळींनी) करून ठेवलेय त्यामुळे माझी हिटाई झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशा कुणाचे तरी नाव विसरला आहात, जिचा सुद्धा (या यशात) वाटा आहे.

 सानिया-शोएबची खिल्ली उडविणारी कमेंट 

याखाली एक जबरदस्त कमेंट पडली आहे. त्यात टेनिसपटू सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर आहे व बाजूला बसलेला पती शोएब मलिक उठण्याच्या बेतात आहे. त्यावर सानिया म्हणते की, बसा-बसा, हे सगळे करून काहीही फायदा नाही. एकीकडे रोहितची पत्नी आहे, जिला यशाचे सगळे श्रेय मिळते. नाही तर मी बघा, जिला पतीच्या अपयशाचा दोष दिला जातो. थोड्या धावा-बिवा करीत जावा यार...

असे विडंबन करीत खिल्ली उडविणाऱ्या युजरचे ट्वीट शेकडो वेळा रीट्वीट झाले आहे आणि त्यास हजारो लाईक्सही लाभले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या