विजय हजारे स्पर्धा - मुंबईच्या विजयात सूर्यकुमारची चमक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

- छत्तीसगडविरुद्ध सनसनाटी हार पत्करलेल्या मुंबईने आपली गाडी काहीशी रुळावर आणता विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्राचा पाच गडी राखून पराभव केला.

- सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक अर्धशतकाने मुंबईचा विजय सोपा केला. 

मुंबई - छत्तीसगडविरुद्ध सनसनाटी हार पत्करलेल्या मुंबईने आपली गाडी काहीशी रुळावर आणता विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्राचा पाच गडी राखून पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक अर्धशतकाने मुंबईचा विजय सोपा केला. 
मुंबईच्या कामगिरीत खूपच चढ-उतार होते. मुंबईने पाऊण शतकी सलामीनंतरही सौराष्ट्रची अवस्था 5 बाद 156 अशी केली होती; पण त्यानंतरही त्यांनी सौराष्ट्रला अडीचशेपर्यंत नेले. मुंबईची सुरुवात 2 बाद 3 अशी झाली. श्रेयस अय्यरच्या 73 धावांनंतरही मुंबईचा डाव तिसाव्या षटकात 5 बाद 133 असा कोलमडत होता; पण त्याच वेळी सूर्यकुमार यादव आणि शुभम रांजणेची जोडी जमली आणि मुंबईने विजय संपादला. 
खरं तर सूर्यकुमार यादवला शतक पूर्ण करण्याची संधी होती; पण त्याने तसेच रांजणेने संघहितास प्राधान्य दिले. रांजणे अर्धशतकापासून पाच धावा दूर राहिला; तर सूर्यकुमार शतकापासून पंधरा धावा. मुंबईस तीस चेंडूंत 29 धावांची गरज होती; पण त्याच वेळी रांजणे आक्रमक झाला. त्याने दोन षटके राखून लक्ष्य मुंबईला गाठून दिले. छत्तीसगडविरुद्धही सूर्यकुमार यादव (81) पाऊण शतक केल्यावर शतक करू शकला नव्हता. 
संक्षिप्त धावफलक ः- सौराष्ट्र ः 9 बाद 245 (शेल्डन जॅकसन 35 - 43 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार, समर्थ व्यास 39 - 56 चेंडूत 7 चौकार, विश्वर्जसिंह जडेजा 25 - 23 चेंडूत 3 चौकार, अर्पित वसवदा 59 - 75 चेंडूत 5 चौकार, चिराग जानी नाबाद 40 - 47 चेंडूत 3 चौकार, धवल कुलकर्णी 5-1-44-1, शार्दूल ठाकूर 10-1-36-3, तुषार देशपांडे 8-0-48-1, शिवम दुबे 9-1-34-0, शम्स मुलानी 10-0-49-3) पराजित वि. मुंबई ः 48 षटकांत 5 बाद 248 (जय बिस्ता 2, आदित्य तरे 29 - 43 चेंडूंत 2 चौकार, श्रेयस अय्यर 73 - 82 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकार, सूर्यकुमार यादव नाबाद 85 - 71 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकार, शिवम दुबे 9, शुभम रांजणे नाबाद 45 - 57 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार, कुशांग पटेल 9-1-33-2, धर्मेंद्रसिंह जडेजा 10-1-39-2). 
 
 


​ ​

संबंधित बातम्या