हिटमॅन रोहितचा कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला महागात पडणार?

वृत्तसंस्था
Sunday, 9 June 2019

हिटमॅन रोहित शर्माचा दुसऱ्या षटकात नॅथन कोल्टर नायलने झेल सोडला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने हा कॅच सोडला असून हा रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना चांगली फलंदाजी केलेली असल्याने हा कॅच ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकतो.

वर्ल्ड कप 2019
ओव्हल: हिटमॅन रोहित शर्माचा दुसऱ्या षटकात नॅथन कोल्टर नायलने झेल सोडला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने हा कॅच सोडला असून हा रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना चांगली फलंदाजी केलेली असल्याने हा कॅच ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकतो.

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची खऱ्या अर्थाने आज कसोटी आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी भारताचा सामना होत आहे. वर्षभरातील दोन्ही संघांच्या कामगिरीचे मोजमाप केले, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून रोहित शर्मा शिखर धवन फलंदाजी करत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या