राष्ट्रीय खुल्या शुटींग स्पर्धेत शाहू मानेला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 June 2019

कोल्हापूर - दिल्ली येथे सुरू असलेल्या १९ व्या कुमार सुरेंदर सिंग राष्ट्रीय खुल्या शुटींग स्पर्धेत कोल्हापूरचा युवा आॅलिंपिक पदक विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू तुषार माने याने १ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळविले.

ज्युनिअर गटात शाहू पाचव्या स्थानावर राहिला. यूथ गटामध्ये त्याने आपली कामगिरी उंचावत २५१:१ गुण मिळवून सुवर्ण पदक जिंकले. तसेच त्याने १० मी एअर रायफल प्रकारामधे ६२९ :२ गुणांचा अचूक वेध घेवून तृतीय स्थानासह अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत २५० : १ गुण मिळवून सिनिअर गटात रौप्य पदक पटकावले. भारतीय नौसेनेचे प्रतिनिधीत्व करणारा महाराष्ट्रीयन नेमबाज किरण जाधवने २५२ : २ गुण मिळवून सुवर्ण, तर मध्य प्रदेशचा नेमबाज ऐश्वर्य प्रताप तोमरने २२८:७ गुणासह कांस्यपदक मिळविले. 

शाहू माने हा छत्रपती शाहू विद्यालयाचा विद्यार्थी असून, दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शुटींग रेंजवर तो सराव करतो. त्याला  आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या आॅलिंपिकपटू सुमा शिरुर यांचे मार्गदर्शन, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्हा मेन ॲनड वुमेन रायफल असोसिएशनचे सहकार्य मिळाले.

​ ​

संबंधित बातम्या