न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

- विजयी आव्हानाचा पाठलाग करतना नाट्यमयरित्या इंग्लंडचा डाव कोसळला आणि न्यूझीलंडने तिसऱ्या टी 20 सामन्यात 14 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 

-  इंग्लंडचा डाव नाट्यमयरित्या कोलमडला. अवघ्या दहा धावांत त्यांचे पाच फलंदाज बाद झाले आणि त्यांना शेवटी पराभवाचा सामना करावा लागला.

नेल्सन (न्यूझीलंड) -  विजयी आव्हानाचा पाठलाग करतना नाट्यमयरित्या इंग्लंडचा डाव कोसळला आणि न्यूझीलंडने तिसऱ्या टी 20 सामन्यात 14 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 180 धावांची मजल मारली. त्यानंतर इंग्लंड 15व्या षटकांपर्यंत एकवेळ 2 बाद 139 अशा सुस्थितीत होते. कर्णधार इयॉन मॉर्गनही भरात होता. त्याने मिशेल सॅंटनेरला दोन षटकारही लगावले. विजय इंग्लंडच्या दृष्टिक्षेपात होता. त्यांनी 31 चेंडूंत अवघ्या 42 धावांची आवश्‍यकता होती. सॅंटनेरने मॉर्गनची विकेट मिळविली आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव नाट्यमयरित्या कोलमडला. अवघ्या दहा धावांत त्यांचे पाच फलंदाज बाद झाले आणि त्यांना शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा डाव 7 बाद 166 असा मर्यादित राहिला. 
इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या घाईमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. डेव्हिड मलान (55) आणि जेम्स व्हिन्स (49) यांनी रचलेल्या पायावर त्यांच्या अन्य फलंदाजांना विजयाची इमारत उभारता आली नाही. 
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गुप्टिल (33) आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम (55) यांच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडला धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यांनी रॉस टेलर (27) आणि जिमी नीशाम (20) यांची साथ मिळाली. 
संक्षिप्त धावफलक ः 
न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 180 (ग्रॅंडहोम 55 -35 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, गुप्टिल 33, टेलर 27, टॉम करन 2-29) वि.वि. इंग्लंड 20 षटकांत 7 बाद 166 (डेव्हिड मलान 55 -34 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, जेम्स व्हिन्स 49, ल्युकीू फर्ग्युसन 2-25, ब्लेअर टिकनेर 2-25) 
 


​ ​

संबंधित बातम्या