या क्रिकेटपटूची पँट सुटली, पण रन-आऊटची संधी नाही निसटली

वृत्तसंस्था
Tuesday, 1 October 2019

सेंट किल्डा ः अॅशेस दौरा गाजविलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅर्नस लाबूशेन पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत फिल्डींगच्या वेळी पँट सुटली तरीही त्याने रन-आऊटची संधी निसटू दिली नाही. 

येथील सिटी पॉवर सेंटरवर मार्श कप स्पर्धेत तो क्वीन्सलँडचे प्रतिनीधीत्व करीत आहे. व्हिक्टोरीयाविरुद्ध 29व्या षटकात वील सदरलँडने चेंडू कव्हरच्या दिशेने मारला आणि तो धावू लागला. त्याचवेळी लाबूशेनने चपळाईने झेप घेत चेंडू अडविला. त्यावेळी त्याची पँट सैल होऊन निसटली होती, पण लाबूशेनने क्षणार्धात अंदाज घेत विकेटकिपरच्या दिशेने थ्रो केला. त्यामुळे ख्रिस ट्रेमैन रन-आऊट झाला.

सुरवातीला तेच टीव्हीवर दिसले. नंतर दुसऱ्या एका कॅमेऱ्यामुळे लाबूशेन खाली गेलेली पँट वर करीत हसत असल्याचे दिसून आले.

https://twitter.com/cricketcomau/status/1178193227318362113?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1178193227318362113&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Faussie-test-star-marnus-labuschagne-drops-pants-while-fielding-still-manages-to-affect-run-out-watch%2Fstory-2jnEbcKZFq5Ww0bVbX9HEL.html

या लढतीत क्विन्सलँडने 9 बाद 322 धावा केल्या. व्हिक्टोरीयाचा डाव 168 धावांत आटोपला.
-----

​ ​

संबंधित बातम्या