असा पराक्रम करणारा आशियातील पाकिस्तानचा पहिलाच संघ

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

PAK VS SA: अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पाकिस्तान संघानं तीन एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ नं जिंकली

PAK VS SA: अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पाकिस्तान संघानं तीन एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ नं जिंकली आहे. पाकिस्तान संघानं तिसारा एकदिवसीय सामना २८ धावांनी जिंकत मालिकेवर नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं निर्धारित ५० षटकांत ३२० धावा चोपल्या होत्या. प्रत्त्युत्तरदाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.३ षटकांत २९२ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानकडून फखर जमान यानं १०१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर बाबर आजम यानं ९४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. 
 
३२१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात जबरदस्त झाली होती. क्विंटन डीकॉक, डेविड मिलरसह अन्य महत्वाच्या खेळाडूच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजांनी आक्रिमक खेळ करत तुफानी सुरुवात दिली. सलामीवीर यानेमन मलानने तुफानी फलंदाजी करत ७१ धावांची खेळी केली. तर काइल वेरेयन ६२ आणि फेलुकवायोने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, अनुभवाची कमी असल्यामुळे विजयासाठी या खेळी अपुऱ्या पडल्या.

पाकिस्तानचा विक्रम -
दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारणाऱ्या पाकिस्तान संघानं आपल्या नावावर नवीन विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेत दोन एकदिवसीय मालिका जिंकणारा पाकिस्तान पहिला देश बनला आहे. २०१३ मध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला २-१ नं पराभूत केलं होतं. पाकिस्तानने साउथ अफ्रीकेला  त्यांच्याच भूमीत दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे. 


​ ​

संबंधित बातम्या