मालविका बनसोडला विजेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

-भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने मालदिव आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मालिकेतील स्पर्धेत विजेतेपद मिळविले

-वरिष्ठ गटातील पहिलेच विजतेेपद

- पुरुष एकेरीत भारताच्या केविन अरोकिया वॉल्टर याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

-दुहेरीत भारताच्या वैभव आणि प्रकाश राज या द्वितीय मानांकित जोडीस विजेतेपद

नवी दिल्ली ः भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने मालदिव आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मालिकेतील स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत तिने मान्यमारच्या अव्वल मानांकित थेट हतार थुझर हिला 21-13, 21-11 असे 31 मिनिटांत पराभूत केले. मालविका स्पर्धेत बिगरमानांकित होती. दरम्यान, पुरुष एकेरीत भारताच्या केविन अरोकिया वॉल्टर याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला थायलंडच्या द्वितीय मानांकित कांतावत लीलावेचाबुटर याच्याकडून 13-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. दुहेरीत भारताच्या वैभव आणि प्रकाश राज या द्वितीय मानांकित ाजेडीने थायलंडच्या पॅकापॉन तीरारात्साकुल आणि पॅनिटचाफॉन तीरारात्सकुल जोडीचा अवघ्या 26 मिनिटांत 21-16, 21-15 असा पराभव केला. 


​ ​

संबंधित बातम्या