World Cup 2019 : न्यूझीलंडचा विंडीजवर 5 धावांनी सनसनाटी विजय
कर्णधार केन विल्यम्सनच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी वेस्ट इंडिजसमोर 292 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानासमोर विंडीजची अवस्था वाईट झाली होती. पण, ब्रेथवेटने 82 चेंडूत शतक झळकावून विंडीजला विजयाच्या जवळ नेले. मात्र, तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि विंडीजच्या विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरले.
मँचेस्टर : अखेरचे षटक सात चेंडूत सहा धावा हव्या आणि जोडीही शेवटची. शतकवीर कार्लोस ब्रेथवेट स्ट्राईकवर असताना षटकार मारून विजय साजरा करण्याच्या प्रयत्नात ब्रेथवेटने मारलेला चेंडू अगदी सीमारेषेवर न्यूझीलंडचा बोल्ट झेल पकडतो अन् विंडीजला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागतो. विश्वकरंडकात शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने विंडीजचा 5 धावांनी पराभव करत गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
You just have to see it to believe it!!!
An all or nothing catch in the deep by Trent Boult is the difference between winning and losing a @cricketworldcup classic.
What an incredible game of cricket!
#BACKTHEBLACKCAPS #MenInMaroon #CWC19 pic.twitter.com/bRSz3429tf— ICC (@ICC) June 22, 2019
कर्णधार केन विल्यम्सनच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी वेस्ट इंडिजसमोर 292 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानासमोर विंडीजची अवस्था वाईट झाली होती. पण, ब्रेथवेटने 82 चेंडूत शतक झळकावून विंडीजला विजयाच्या जवळ नेले. मात्र, तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि विंडीजच्या विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरले.
त्यापूर्वी, सामन्यातील पहिल्याच षटकांत दोन सलामीचे फलंदाज गमाविल्यानंतरही विल्यम्सन आणि रॉस टेलर उभे राहिल्यामुळे न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 291 धावा केल्या. विल्यम्सनने सलग दुसरे शतक झळकाविताना 148 धावांची खेळी केली. टेलरने 69 धावांचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा विंडीजचा धाडसी निर्णय पहिल्याच षटकांत योग्य ठरतो की काय अशी शंका आली. शेल्डन कॉट्रेलने पहिल्या षटकांत 10 धावा दिल्या खऱ्या, पण बदल्यात पहिल्या आणि पाचव्या चेंडूंवर न्यूझीलंडचे मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्रो हे सलामीचे फलंदाज गारद केले. दोघांनाही खाते उघडता आले नाही. या पहिल्याच षटकातील धक्क्यानंतर न्यूझीलंड संघावरील दडपण वाढविण्यात विंडीज गोलंदाज अपयशी ठरले.
विल्यम्सन आणि टेलर या अनुभवी फलंदाजांनी नांगर टाकून केलेली फलंदाजी निर्णायक ठरली. विंडीजच्या गोलंदाजांनी आतापर्यंतच्या तुलनेत किमान टप्पा राखून गोलंदाजी केली. मात्र विल्यम्सन आणि टेलर यांना अडचणीत आणण्यात ते अपयशी ठरले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यासाठी सात गोलंदाजांचा वापर विंडीज कर्णधार होल्डरला करावा लागला. त्या वेळी बदली गोलंदाज गेलने टेलरची विकेट मिळविली. त्यानंतर पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या मधल्या फळीचे दुखणे काही प्रमाणात सुधारलेले दिसून आले. प्रत्येकाने चेंडूला धाव घेत वेग कायम राखला. विल्यम्सन (148) बाद झाल्यावर अखेरच्या 21 चेंडूंत न्यूझीलंडच्या तळातील फलंदाजांनी 40 धावांची भर घालून आव्हान भक्कम केले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकांत 8 बाद 291 (केन विल्यम्सन 148 -154 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार, रॉस टेलर 69 -95 चेंडू, 7 चौकार, जेम्स निशाम 28, शेल्डन कॉट्रेल 10-1-56-4, कार्लोस ब्रेथवेट 6-0-58-2) विजयी वि. वेस्ट इंडीज