चॅम्पियन्स लीग सामन्यापूर्वीच बार्सिलोनाच्या खेळाडूला कोरोनाची लागण 

टीम ई-सकाळ
Wednesday, 12 August 2020

बार्सिलोना संघातील एका फुटबॉलपटूला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यांच्या अगोदर अ‍ॅटलेटिको माद्रिद संघातील दोन फुटबॉलपटूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यानंतर आता बार्सिलोना संघातील एका फुटबॉलपटूला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यात बार्सिलोना संघाची लढत बायर्न म्युनिच संघासोबत होणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्याच्या दोन दिवसांपूर्वीच बार्सिलोना संघातील खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

बार्सिलोना क्लबने आज बुधवारी जाहीर केलेल्या निवेदनात, पूर्व-हंगाम प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत नऊ खेळाडूंपैकी एका खेळाडूचा अहवाल सकारात्मक आला असल्याचे सांगितले आहे. शिवाय या खेळाडूमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे बार्सिलोना क्लबने  आपल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच कोरोना बाधित खेळाडूचे प्रशिक्षण थांबवण्यात आले असून, या खेळाडूला विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे क्लबने म्हटले आहे. परंतु या बार्सिलोना खेळाडूचे नाव क्लबने उघड केलेले नाही.     

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

काही दिवसांपूर्वीच 'ला लिगा'च्या स्पर्धेनंतर आगामी चॅम्पियन्स लीगच्या हंगामासाठी नऊ खेळाडू पूर्व हंगाम प्रशिक्षण सुरु करणार असल्याचे बार्सिलोना क्लबने जाहीर केले होते. त्यानुसार पेड्री, ट्रायन्को, मॅथियस फर्नांडिस, तोडीबो, वागुए, अले, रफिन्हा, मिरांडा आणि ओरिएल बस्केट्स या खेळाडूंची पूर्व हंगाम प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या नऊ खेळाडूंसाठी पूर्व हंगाम प्रशिक्षण गुरुवारी म्हणजे उद्या 13 ऑगस्ट पासून, सियटॅट एस्पोरटिवा जॉन गॅम्पर येथे सुरू होणार होते.      


​ ​

संबंधित बातम्या