अफगाणी खेळाडू नसले तरी, उद्‍घाटनाला राष्ट्रध्वज असणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 August 2021

पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्या होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या इतर देशांप्रमाणे अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज आणण्यात येणार आहे. आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून देण्यासाठी ऑलिंपिक समिती आणि जपान पॅरालिंपिक समितीने हे पाऊल उचलले आहे. अफगाणिस्तानचा एकही खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार नाही.

टोकियो - पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्या होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या इतर देशांप्रमाणे अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज आणण्यात येणार आहे. आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून देण्यासाठी ऑलिंपिक समिती आणि जपान पॅरालिंपिक समितीने हे पाऊल उचलले आहे. अफगाणिस्तानचा एकही खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार नाही.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रध्वजाची ही माहिती आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीचे प्रमुख अँड्र्यू पर्सन्स यांनी दिली. याद्वारे आम्ही जगाला शांततेचाही संदेश देणार आहोत असे ते म्हणाले.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू पॅरालिंपिक स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तालयातील शरणार्थी अफगाणिस्तानचा ध्वज उद्‍घाटन सोहळ्यात आणतील.

पॅरालिंपिक स्पर्धेत अफगाणिस्तानचे दोन खेळाडू सहभागी होणार होते, यात महिला तायक्वांदोपटू झाकिया खुदादिदी हिचा समावेश होता. ती पॅरालिंपिक खेळणारी अफगाणची पहिली दिव्यांग महिला खेळाडू ठरली असती.


​ ​

संबंधित बातम्या