युवा आंशू मलिकची अंतिम फेरीत धडक; नरसिंग यादवचा सलामीलाच पराभव 

संजय घारपुरे
Wednesday, 16 December 2020

आंशू मलिकने वैयक्तिक विश्वकरंडक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पण त्याच वेळी नरसिंग यादवला पुनरागमनाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. 

मुंबई : आंशू मलिकने वैयक्तिक विश्वकरंडक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पण त्याच वेळी नरसिंग यादवला पुनरागमनाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. 

जागतिक कॅडेट स्पर्धेत काही वर्षांपूर्वी पदक जिंकलेल्या आंशूने काही वर्षांत वेगाने प्रगती केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षीही तिने वरिष्ठ गटात पदके जिंकली होती. आता 19 व्या वर्षी तिने 57 किलो गटाची अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीत रशियाच्या वेरोनिका चुमिकोवा हिला 7-4 असे पराजित केले. 

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जानेवारी - फेब्रुवारीत? 

दरम्यान, चार वर्षांनंतर खेळत असलेल्या पहिल्या स्पर्धेत नरसिंगला 74 किलो गटात जर्मनीच्या ओस्मान कॅकिसी याच्याविरुद्ध 9-10 अशा पराभवास सामोरे जावे लागले. सामन्याच्या सुरुवातीस नरसिंगला आपल्याविरोधात गेलेला निर्णय पसंत पडला नाही. त्यास आक्षेप घेण्याचे नरसिंगने ठरवले. मार्गदर्शकांचा विरोध असतानाही तो आग्रही राहिला आणि या एका गुणाच्या फरकानेच तो पराजित झाला. 

आशियाई विजेता रवी दहिया याला हंगेरीच्या हॅलीदोव याने 57 किलो गटात चीतपट केले. दहिया 6-4 आघाडीवर असताना त्याला हार पत्करावी लागली. नवीन 70 किलो गटात किर्गीजस्तानच्या इस्लाम्बेक ओरोझ्बेकोव याच्याविरुद्ध 2-12 पराभूत झाला. सुमीतचे 125 किलो गटातील आव्हान पात्रता फेरीतच संपले.


​ ​

संबंधित बातम्या