जागतिक महासंघाकडून भारतीय संघटनेचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

उत्तेजकांच्या वापराविरोधात भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने घेतलेल्या कठोर उपाययोजनांचे जागतिक ॲथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी कौतुक केले.

नवी दिल्ली : उत्तेजकांच्या वापराविरोधात भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने घेतलेल्या कठोर उपाययोजनांचे जागतिक ॲथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी कौतुक केले. त्यांनी कोरोना कालावधीतही ॲथलीट्सना सक्रिय ठेवल्याबद्दलही अभिनंदन केले आहे. 

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धात भारताची कामगिरी उंचावत आहे, याबद्दल को यांनी समाधान व्यक्त केले. महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे को यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ॲथलेटिक्‍समधील उत्तेजकांचा वापर रोखण्यासाठी भारत कठोर उपाययोजना करीत आहे, ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. कोरोना कालावधीत याचा वापर रोखणे हे आव्हानात्मक आहे. कोरोनाचे आव्हान असताना अनेक महासंघ या आव्हानापासून दूर जात असताना भारत यास सामोरे जात आहे, त्याचा मला आनंद आहे. 

रिटायरमेंटच्या प्रश्नावर धोनी म्हणाला, डेफिनेटली नॉट   

ऑलिंपिक स्पर्धा घेण्याची जिद्द संयोजकांनी बाळगली आहे. याची जाणीव खेळाडूंनाही असायला हवी, असे लॉर्ड को म्हणाले. त्यांनी भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाच्या अध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सांगता दिनी सर्व संलग्न राज्य संघटनांनी कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे प्रेझेंटेशन केले. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन स्पर्धा कशा सुरू करता येतील याचा विचार करण्यात आला.


​ ​

संबंधित बातम्या