सत्तर मीटर अंतरावरून १२.२ सेमी वर्तुळभेद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील खुल्या मैदानात होणाऱ्या तसेच एकाग्रतेचा कस लागणारा खेळ म्हणजे तिरंदाजी. यात रिकर्व्ह, कम्पाउंड तसेच बेअरबो हे तीन प्रकार असतात; पण त्यातील रिकर्व्ह प्रकाराचीच स्पर्धा ऑलिंपिकमध्ये होत असते. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील खुल्या मैदानात होणाऱ्या तसेच एकाग्रतेचा कस लागणारा खेळ म्हणजे तिरंदाजी. यात रिकर्व्ह, कम्पाउंड तसेच बेअरबो हे तीन प्रकार असतात; पण त्यातील रिकर्व्ह प्रकाराचीच स्पर्धा ऑलिंपिकमध्ये होत असते. 

सत्तर मीटर अंतरावरून तिरंदाज लक्ष्याचा वेध घेतात. या लक्ष्य वर्तुळाचा डायमीटर १२२ सेंटिमीटर असतो आणि त्यातही अचूक दहा गुण देणारे वर्तुळाचा डायमीटर असतो १२.२ सेंटिमीटर. प्राथमिक फेरीत सर्व तिरंदाज ७२ वेळा लक्ष्यवेध करतात. त्यातून त्यांची क्रमवारी निश्चित होते. त्यानुसार सामने होतात. हे सामने पाच सेटचे असतात. वैयक्तिक स्पर्धेत एका सेटमध्ये तिरंदाज तीनदा लक्ष्यवेध करतात, तर मिश्रदुहेरीत चार वेळा आणि सांघिक स्पर्धेत सहा वेळा. 

पदके किती 
पाच सुवर्णपदकांसाठी एकूण चुरस. पुरुष तसेच महिलांमधील सांघिक तसेच वैयक्तिक. त्यासोबत मिश्र दुहेरीतही. 

सहभाग 
६४ पुरुष आणि ६४ महिला तिरंदाज वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धेत खेळणार. 

रिओत काय घडले 
दक्षिण कोरियाने पुरुष तसेच महिलांचे सांघिक तसेच वैयक्तिक अशी चारही सुवर्णपदके जिंकली. 

टोकियोत काय घडणार 
अमेरिकेचा तीन वेळचा विजेता ब्रॅडी एलिसन आणि द.कोरियाच्या महिला तिरंदाजांचे वर्चस्व अपेक्षित. १९८८ मध्ये पहिल्यांदा स्पर्धा. तेव्हापासून दक्षिण कोरियाने सर्व महिला सांघिक सुवर्णपदके जिंकली आहेत. 

यंदा नवे काय 
टोकियो ऑलिंपिकपासून मिश्र दुहेरीची तिरंदाजी स्पर्धा प्रथमच होत आहे.

ठिकाण 
युमेनोशिमा पार्क आर्चरी फिल्ड, टोकियो

स्पर्धा कालावधी
२३ ते ३१ जुलै

भारतीय आव्हान - जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकून भारतीय संघाची पात्रता तसेच नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दीपिका कुमारीची तीन सुवर्णपदके

जाता - जाता - १९०० च्या स्पर्धेत प्रथम समावेश, पण त्यानंतरच्या अनेक स्पर्धात विविध कारणास्तव विरोध. जागतिक संघटनेची स्थापना झाल्यावर १९७२ पासून तिरंदाजीची स्पर्धा नियमितपणे.


​ ​

संबंधित बातम्या