अर्जुन-अरविंद रिपेचेज उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील लाईटवेट मेन्स डबल स्कल्समधील रिपेचेजच्या उपांत्य फेरीस पात्र ठरले आहेत. यामुळे भारतीय स्पर्धक प्रथमच रोईंगच्या उपांत्य फेरीत खेळणार आहेत.

टोकियो - अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील लाईटवेट मेन्स डबल स्कल्समधील रिपेचेजच्या उपांत्य फेरीस पात्र ठरले आहेत. यामुळे भारतीय स्पर्धक प्रथमच रोईंगच्या उपांत्य फेरीत खेळणार आहेत. 

रिपेचेजच्या दुसऱ्या फेरीत असलेले अर्जुन-अरविंद यांनी ६ मिनिटे ५१.३६ सेकंद वेळ दिली. त्यांची वेळ शर्यतीत अव्वल आलेल्या पोलंडच्या जोडीपेक्षा ७.९२ सेकंदांनी जास्त होती. या शर्यतीतील पहिले तिघे उपांत्य फेरीच्या रिपेचेजसाठी पात्र ठरतात. या दोन हजार मीटरच्या शर्यतीत भारतीय एक हजार मीटरपर्यंत चौथे होते, पण त्यानंतर त्यांनी उझबेकिस्तानच्या जोडीस मागे टाकले. प्राथमिक फेरीत पाचवे आल्यामुळे अर्जुन आणि अरविंद स्पर्धेच्या उपांत्य फेरीस थेट पात्र ठरले नव्हते. या शर्यतीतही त्यांनी एका क्रमांकाने प्रगती केली होती, त्यामुळे रिपेचेजमध्ये प्रगती केली होती.

मार्गदर्शक अब्बास अली बेग यांनी सांगितले तेच आम्ही केले, त्यांनी आम्हाला भारताची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. यापूर्वी कधीही भारतीय स्पर्धक उपांत्य फेरीत खेळलेला नाही, असे अरुणलाल जाटने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या