भारतीय जोडीचा वेग जोरदार वाऱ्याने रोखला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

अरविंद सिंग आणि अरुण लाल जाट सुरुवातीच्या पीछाडीनंतर आव्हान निर्माण करीत असताना जोरदार वारे सुरू असलेल्या सर्वांत बाहेरच्या लेनमध्ये असलेल्या भारतीय जोडीस त्याचा त्रास झाला आणि ते उपांत्य फेरीत अखेरच्या क्रमांकावर गेले. आता त्यांना फार तर सातव्या क्रमांकाची संधी असेल.

टोकियो / मुंबई - अरविंद सिंग आणि अरुण लाल जाट सुरुवातीच्या पीछाडीनंतर आव्हान निर्माण करीत असताना जोरदार वारे सुरू असलेल्या सर्वांत बाहेरच्या लेनमध्ये असलेल्या भारतीय जोडीस त्याचा त्रास झाला आणि ते उपांत्य फेरीत अखेरच्या क्रमांकावर गेले. आता त्यांना फार तर सातव्या क्रमांकाची संधी असेल.

रोईंगची शर्यत खूपच वेगवान असते. आघाडीवरील आयर्लंड आणि अखेरच्या सहाव्या क्रमांकावरील भारताच्या जोडीतील फरक केवळ १९ सेकंदाचा होता. 

भारतीय जोडी ५०० मीटरनंतर चौथी होती, तर एक हजार मीटरनंतर पाचवी होती, पण दीड हजार मीटरच्या सुमारास भारतीय सहाव्या क्रमांकावर गेले, ते प्रगती करू शकले नाहीत. अंतिम फेरीसाठी अव्वल तीन जोड्या पात्र ठरल्या. 

भारतीय जोडी वेग वाढविणार त्याचवेळी वेगाचा वारा सुरू झाला. अखेरच्या लेनमधील भारतीयांना त्याचा जास्त फटका बसला. त्यानंतरही भारतीय जोडीने ६ मिनिटे २४.४१ सेकंद ही सर्वोत्तम वेळ दिली, असे भारतीय रोईंग संघटनेचे सचिव एम. व्ही. श्रीराम यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या