आशियाई सुवर्णविजेते गुलाम मोहम्मद खान यांचे पुण्यात निधन

पीटीआय
Monday, 3 May 2021

नवी दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले अश्वारोहक कर्नल (निवृत्त) गुलाम मोहम्मद खान (वय ७४) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले.

जयपूर - नवी दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले अश्वारोहक कर्नल (निवृत्त) गुलाम मोहम्मद खान (वय ७४) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. 

ते १९७३ मध्ये लष्कराच्या अकादमीत दाखल झाले. एका वर्षातच त्यांनी पोलो तसेच अश्वारोहण स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी केली. ते १९८० ते १९९० या कालावधीत एएससी संघाचे कर्णधार होते. त्या कालावधीत एएससी संघ सहा वेळा राष्ट्रीय विजेता झाला होता. त्यांनी १९८२ च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते तसेच सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. चार वर्षानंतरच्या सोल आशियाई स्पर्धेत त्यांनी वैयक्तिक तसेच सांघिक ड्रेसेज स्पर्धेत ब्राँझ जिंकले होते. 


​ ​

संबंधित बातम्या