शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याचे अहमदाबादमध्ये कोरोनामुळे निधन

पीटीआय
Saturday, 1 May 2021

दोन जागतिक स्पर्धेत पदक जिंकलेला शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याचे अहमदाबादमध्ये कोरोनामुळे निधन झाले. हजारो तरुणांना फिटनेसचे धडे देणारा जगदीश ३४ वर्षांचा होता.

मुंबई - दोन जागतिक स्पर्धेत पदक जिंकलेला शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याचे अहमदाबादमध्ये कोरोनामुळे निधन झाले. हजारो तरुणांना फिटनेसचे धडे देणारा जगदीश ३४ वर्षांचा होता. 

जगदीशने २०१४ मध्ये मुंबईत, तसेच २०१५ मध्ये बँकॉकला झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्याने गटातील सरस स्पर्धक संग्राम चौगुले, विपीन पीटर, सुनीत जाधव यांना पराजित करण्यासाठी केलेले प्रयत्न कमी पडले. पराजित झाल्यावर न चिडता त्याने कायम मी कुठे कमी पडलो, असे विचारून सातत्याने शिकण्याची तयारी दाखवली होती. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल गावच्या जगदीशचे मि. युनिव्हर्स प्रेमचंद डेगरांना आदर्श होते. त्यात कारकीर्द करण्याचे स्वप्न त्याने मनाशी बाळगले. त्यासाठी आवश्यक असलेला खर्च कण्यासाठी त्याने फिजिकल ट्रेनर म्हणून काम सुरू केले. मितभाषी असणारा जगदीश विजेता आहे, असे अनेकदा चाहत्यांचे मत असायचे; पण त्यानंतरही त्याने कधीही पराभवानंतर आकांडतांडव केले नाही.


​ ​

संबंधित बातम्या