प्रतिस्पर्ध्याच पंच जीवावर बेतला; रिंगमध्ये कोसळलेला बॉक्सर आयुष्याची लढाई हरला (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 February 2021

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली असून या  स्पर्धेच्या आयोजनापासून काढता पाय घेतला आहे.

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये एक धक्कादाय घटना घडली आहे. फाईट सुरु असताना पंच लागून एका 33 वर्षीय बॉक्सरने जीव गमावला आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूने तोंडावर मारलेल्या पंच नंतर मोहम्मद असलम  (Muhammad Aslam Khan) रिंगमध्ये खाली कोसळला. मोहम्मद याला किक बॉक्सिंग या खेळात नाव कमावले होते. कराची (Karachi) येथील एका स्थानीक क्लबमध्ये पाकिस्तान बॉक्सिंग काउंसिल द्वारा आयोजित "फाइट नाइट सीरीज"मध्ये सहभागी झाला होता. क्रूज वेट कॅटेगरी बाउट मध्ये  मोहम्मद वली (Muhammad Wali) नावच्या बॉक्सरविरुद्धच्या लढतीत ही दुर्घटना घडली.  

शनिवारी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंच तोंडावर बसल्यानंतर मोहम्मद असलम जमीनीवर कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर त्याला तात्काल जवळच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना मोहम्मद असलमने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

IPL 2021 Auction : या 3 अनकॅप्ड खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली असून या  स्पर्धेच्या आयोजनापासून काढता पाय घेतला आहे. आमचा या तथाकथित स्पर्धेशी काहीही संबंध नाही. या स्पर्धेला आम्ही परवानगी दिली नव्हती. खेळाडूंच्या सुरक्षिततेविषयी आम्ही कोणताही समझोता करणार नाही, असे  पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे महासचिव कर्नल नासिर तुंग यांनी जिओ न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.  

या घटनेचा तपास करण्यासाठी पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने दोन सदस्यीय समिती नेमली आहे. सगर बलोच आणि यूनिस पठान यांचा यात समावेश असून या घटनेसंदर्भातील अहवाल ते फेडरेशनला देणार आहेत.  पाकिस्तानचा आघाडीचा बॉक्सर मोहम्मद वसीम यानेही घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. सरकारने या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे त्याने म्हटले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या