कोच परदेशात अडकले; ऑलम्पिक पात्र बॉक्सरची परराष्ट्रमंत्र्यांकडे धाव

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळालेल्या बॉक्सर विकास कृष्णने त्याचे प्रशिक्षक अमेरिकेत अडकले असल्याने भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची मदत मागितली आहे.

टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळालेल्या बॉक्सर विकास कृष्णने त्याचे प्रशिक्षक अमेरिकेत अडकले असल्याने भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची मदत मागितली आहे. नवीन व्हिसा प्रोटोकॉलमुळे आपले प्रशिक्षक अमेरिकेत अडकून पडले आहेत. आणि त्यामुळे मदत करण्याची मागणी टोकियो ऑलिम्पिकसाठी कोटा मिळालेल्या बॉक्सर खेळाडू विकास कृष्णने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

इंडिया ओपन मे मध्ये; बीडब्ल्यूएफने जारी केले नवीन वर्षातील स्पर्धांचे वेळापत्रक...

बॉक्सर विकास कृष्णने सोशल मीडियाच्या ट्विटरवर ट्विट करताना, ऑलिम्पिक साठीच्या तयारीसाठी कमी कालावधी राहिलेला असून, प्रशिक्षकांसमवेत प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. तर नव्या व्हिसा प्रोटोकॉलमुळे कोच अमेरिकेत अडकले असून, त्यांना भारतात परतणे शक्य होत नसल्याचे विकास कृष्णने ट्विट मध्ये लिहिले आहे. याशिवाय आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे आपले स्वप्न आहे. आणि त्यामुळे प्रशिक्षणासाठी त्यांची गरज असून, मदतीची मागणी विकास कृष्णने केली आहे.    

सिरी-ए फुटबॉल लीग : मिलानच्या राफेल लिओने काही सेकंदात गोल करत रचला विक्रम   

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) यावर्षी सप्टेंबरमध्ये विकासला 30 नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षक रॉन सिम्स ज्युनियर यांच्यासह अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची मंजुरी दिली होती. तर यावर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या संकटामुळे पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय ओआयसी आणि टोकियो स्पर्धेच्या आयोजकांनी घेतला होता. त्यामुळे ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्टच्या दरम्यान खेळवण्यात येणार आहे.  

 

 


​ ​

संबंधित बातम्या