Olympic Games : ब्रेकडान्सचा ऑलिम्पिक खेळात समावेश  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

ब्रेकडान्सचा समावेश आता ऑलिम्पिक स्पर्धेत करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रेकडान्स हा अधिकृत ऑलिम्पिक खेळाचा भाग झालेला आहे.

ब्रेकडान्सचा समावेश आता ऑलिम्पिक स्पर्धेत करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रेकडान्स हा अधिकृत ऑलिम्पिक खेळाचा भाग झालेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पॅरिसच्या 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत ब्रेकडान्सचा समावेश करण्यात आलेला असल्याचे म्हटले आहे. तरुण दर्शकांना आकर्षित करण्यासाठी  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिककडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेकडान्स शिवाय स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग या खेळांचा देखील समावेश ऑलिम्पिक स्पर्धेत करण्यात आला आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग : डॅनीच्या पेनल्टी गोलने साऊथहॅम्पटनचा ब्रायटनवर विजय    

आयओसीने टोकियोच्या तुलनेत पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धेत पदक स्पर्धांची संख्या दहाने कमी केली आहे. त्यामुळे पॅरिस मध्ये 329 पदकांचे आयोजन केले जाणार आहे. यासह 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंचा कोटा 10500 राहणार असल्याचे आयओसीने स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासकीय अनियमिततेचा सामना बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग मध्ये होत असल्याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 120 खेळाडूंनाच समावेश देण्यात येणार असल्याचे आयओसीने म्हटले आहे. 

याशिवाय, भविष्यात ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि स्त्रियांचा समान समावेश करण्यासंदर्भात नियोजन असल्याचे आयओसीने सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी ब्यूनस आयर्स येथे ब्रेकडान्सच्या यशस्वी चाचणीनंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. नंतर आयओसी बोर्डाने ब्रेकडान्सला मंजुरी दिली आहे.    


​ ​

संबंधित बातम्या