सायकलिस्ट चॅम्पियनला डोपिंगच ग्रहण; चार वर्षांच्या बंदीमुळं ऑलिम्पिकला मुकणार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

2018 मधील स्पर्धेमध्ये झालेल्या उत्तेजक द्रव चाचणीचा रिपोर्ट समोर आला असून यात तो दोषी आढळाल आहे. परिणामी त्याला आगामी ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे

Track Cyclist Fabian Puerta Four Year Doping Ban : कोलंबियाचा दिग्गज ट्रॅक सायकलिस्ट फॅबियन पुएर्ता डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे. 2018 चा विश्व चॅम्पियन आणि टोकियो ऑलिम्पिकची आस असलेलल्या या खेळाडूवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

2018 मधील स्पर्धेमध्ये झालेल्या उत्तेजक द्रव चाचणीचा रिपोर्ट समोर आला असून यात तो दोषी आढळाल आहे. परिणामी त्याला आगामी ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. प्रदूषित मांस सेवनातून पदार्थ शरीरात गेला असावा, असा दावा पुएर्ताने केलाय.  

ला लिगा : रेयाल माद्रिदची संयुक्त अग्रस्थानी झेप

सायकलिंगची आघाडीची संस्था असलेल्या यूसीआयने त्याला डोपिंग टेस्टमध्ये दोषी ठरवले. त्याच्यावर 4 वर्षांच्या बंदीची कारवाई  करण्यात आली आहे. पुएर्ताने  2011  आणि 2015 मध्ये  अमेरिकन क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. 20018 मध्ये चो विश्व चॅम्पियनशिपचा विजेता ठरला होता. सातत्यने होणाऱ्या दमदार  कामगिरीमुळे  तो  ऑलिम्पिकमध्ये कशी लक्षवेधी खेळ  करेल, अशी आस होती. मात्र आता त्याला जगातील मानाची स्पर्धेत खेळता येणार नाही. भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या