कोरोना चाचणीचे खेळाडूंवर दडपण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 May 2021

क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात नियमितपणे खेळाडू, पदाधिकाऱ्यांची चाचणी होत आहे; पण या चाचणीच्या बदलत्या निकालांचे खेळाडूंवर दडपण येत आहे.

नवी दिल्ली - क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात नियमितपणे खेळाडू, पदाधिकाऱ्यांची चाचणी होत आहे; पण या चाचणीच्या बदलत्या निकालांचे खेळाडूंवर दडपण येत आहे.

बंगळूर येथील क्रीडा प्राधिकरणात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या चाचणीत २२ जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांना तातडीने विलगीकरणात जाण्यास सांगण्यात आले; पण यात २२ पैकी २१ जण फेरचाचणीत निगेटिव्ह आढळले. यात अॅथलीटस्् तसेच हॉकीपटूंचा समावेश आहे. 

बाधित अॅथलीटस््मध्ये ऑलिंपिक पात्रता मिळवलेल्या चालण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांचा समावेश होता. मात्र आता तेही निगेटिव्ह आहेत, असे सांगण्यात आले आहे. त्यांना विलगीकरणात जावे लागल्याने त्यांच्या सरावावर परिणाम झाला, याकडे लक्ष वेधले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या