सायकलिंग स्पर्धेतील अपघातानंतर खेळाडू कोमात; टक्कर देणाऱ्यावर बंदीची कारवाई

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Thursday, 12 November 2020

आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघ (आयसीयू) ने दिलेल्या माहितीनुसार, या घटननेनंतर नियमाच उल्लंघन केल्याप्रकरणी अनुशासनात्मक पॅनलने ग्रोएनेवेगेनवर बंदी घातली आहे. त्याला 7 मे पर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. टूर डि फ्रान्स स्पर्धेतील चारवेळचा चॅम्पियन ग्रोएनेवेगेन ही घटना आयुष्यातील सर्वात दुर्देवी घटना होती, अशी प्रतिक्रिया दिली होती. या घटनेमुळे करियरवर लागलेला डाग कधीही विसरु शकणार नाही, असेही त्याने म्हटले होते.  

प्रतिस्पर्धी खेळाडूला जोराची धडक दिल्याच्या आरोपाखाली सायकलपटू डायलन ग्रोएनेवेगेन याच्यावर 9 महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. नँदरलंडच्या या सायकलिस्टने टू डी पोलँड स्पर्धेतील शर्यतीमध्ये शेवटच्या क्षणाला फाबियो जॅकबसन याला टक्कर दिली होती. या अपघातामध्ये जॅकबसन बॅरेटवर जाऊन धडकला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  

बोला था आपको मामू, इनकी गणित वीक है; रोहितची ट्विटरवर फटकेबाजी

आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघ (आयसीयू) ने दिलेल्या माहितीनुसार, या घटननेनंतर नियमाच उल्लंघन केल्याप्रकरणी अनुशासनात्मक पॅनलने ग्रोएनेवेगेनवर बंदी घातली आहे. त्याला 7 मे पर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. टूर डि फ्रान्स स्पर्धेतील चारवेळचा चॅम्पियन ग्रोएनेवेगेन ही घटना आयुष्यातील सर्वात दुर्देवी घटना होती, अशी प्रतिक्रिया दिली होती. या घटनेमुळे करियरवर लागलेला डाग कधीही विसरु शकणार नाही, असेही त्याने म्हटले होते.  

दिग्गज क्रिकेटर म्हणतायेत; T20 मध्ये टीम इंडियाची कॅप्टन्सी रोहितकडे द्या!

या शर्यतमीमध्ये  ग्रोएनेवेगेनन याच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात आले होते. शर्यत अयोग्य घोषीत करुन जॅकबसनला विजेताही घोषीत करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. आपल्याला आखून दिलेली मर्यादा सोडून भरकटल्याची कबुली ग्रोएगेवेगेनन याने दिल्याची माहितीही आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघाने दिली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या