दिल्ली अर्धमॅरेथॉन सहभाग स्पर्धकांसाठी आत्मघातकी 

संजय घारपुरे
Friday, 27 November 2020

दिल्लीत रविवारी होणारी अर्धमॅरेथॉन ही स्पर्धकांसाठी आत्मघातकी ठरेल असा इशारा राजधानीतील डॉक्‍टर देत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत रविवारी होणारी अर्धमॅरेथॉन ही स्पर्धकांसाठी आत्मघातकी ठरेल असा इशारा राजधानीतील डॉक्‍टर देत आहेत. कोरोनाचे आक्रमण तसेच हवा प्रदूषीत असल्याचा फटका स्पर्धकांना बसेल, असे डॉक्‍टरांचे मत आहे. 

मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रम नोंदवलेली ब्रिगीद कॉस्गेई (केनिया), दोन वेळचा विजेता अँदामॅलाक बेलिहू (इथिओपिया) यांच्यासह 49 अव्वल ऍथलीटचा या 21 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभाग असेल. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरील ही स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होत असल्याचे संयोजकांनी सांगितले. 

नापोलीच्या सर्व खेळाडूंची दहा क्रमांकाची जर्सी 

नवी दिल्लीतील एकूण कोरोना रुग्ण पाच लाखापेक्षा जास्त आहेत. हवा कमालीची प्रदूषित आहे. या परिस्थितीत या स्पर्धेतील सहभाग आत्मघातकीच ठरेल, असे लुंग केअर फौंडेशनचे संस्थापक विश्वस्त अरविंद कुमार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय ऍथलीट असा किंवा गावातील लहान मुलगा प्रदूषणाचा धोका सर्वांना सारखाच असतो असे त्यांनी सांगितले. 

एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनीही शर्यतीसाठी सध्याचे वातावरण योग्य नसल्याचे सांगितले. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे सध्या खुल्या वातावरणात शारीरीक कसरतीही करणे योग्य नव्हे. यामुळे फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. आघाडीच्या धावपटूंवरही याचा परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. 

फिफाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या शर्यतीत मेस्सी, रोनाल्डो, सालाह आणि...

या स्पर्धेत दरवर्षी हजारो धावपटू सहभागी होतात, पण यावेळी या धावपटूंना बुधवार ते रविवार दरम्यान कधीही धावून आपली वेळ नोंदवण्यास सांगितले आहे. गेल्या काही वर्षापासून दिल्लीतील प्रदूषण हिवाळ्यात वाढत आहे. त्यातच यंदा कोरोनाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आहेत. 

कोरोनाचा फटका आम्हालाही बसला आहे. दिल्लीत धावण्यासाठी कुटुंबियांचे मन वळवावे लागले. कोरोनाचा फटका जगातील सर्वच क्रीडा स्पर्धांना बसत आहे, मात्र आम्ही खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 
- ब्रिगीद कॉस्गेई, जागतिक विक्रमवीर


​ ​

संबंधित बातम्या