ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टचे दिवस फिरले ; पोट भरण्यासाठी बनला डिलिव्हरी बॉय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील सर्वच देशांना चांगलीच झळ बसली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्यामुळे अनेक लोकांना आपला रोजगार देखील गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील सर्वच देशांना चांगलीच झळ बसली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्यामुळे अनेक लोकांना आपला रोजगार देखील गमवावा लागला आहे. व्हेनेझुएला देशात देखील कोरोनामुळे अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून, ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावे लागत आहे. 

एटीपी फायनल्स : थीमचा पराभव करत डॅनियल मेदवेदेवने रचला इतिहास  

व्हेनेझुएलाचा तलवारबाज रुबेन लिमार्डोला आपले पोट भरण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावे लागत आहे. रुबेन लिमार्डो सध्या पोलंडमध्ये सायकल वरून डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. रुबेन लिमार्डोने लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तलवारबाजीत सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला होता. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने रुबेनला सायकल वरून डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागत आहे.     

रुबेन लिमार्डोने सोशल मीडियावरील ट्विटरवरून यासंबधीची माहिती दिली आहे. लिमार्डोने केलेल्या या ट्विट मध्ये त्याने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. आणि त्यासोबतच त्याने आपल्याला स्वतःचा मार्ग शोधायचा असतो, आणि डिलिव्हरी बॉयचे काम देखील इतरांसारखेच असल्याचे लिहिले आहे. तसेच आपल्या या ट्विट मध्ये रुबेन लिमार्डोने सराव करून झाल्यानंतर डिलिव्हरी बॉयचे काम करत असल्याचे सांगितले आहे. 

IPL2020 : कोरोनाच्या संकटातही BCCI ने साधली संधी; IPL मध्ये कमावले इतके रुपये   

याव्यतिरिक्त 2020 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत स्थगित केल्यामुळे स्पॉन्सरर देखील पुढच्या वर्षीच्या सुरवातीलाच पैसे देण्यास सक्षम असतील. आणि त्यामुळेच डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागत असल्याचे लिमार्डोने म्हटले आहे. आणि प्रत्येक वेळेस डिलिव्हरी केल्यानंतर स्वतःला 2021 च्या  टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यास मदत होईल, असे सांगत असल्याचे रुबेन लिमार्डोने या ट्विट मध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, रुबेन लिमार्डो व्यतिरिक्त व्हेनेझुएलाच्या तलवारबाजी संघाचे 20 अन्य सदस्यही कोरोनाच्या काळात  डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. लिमार्डोने आठ वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. व 1904 पासून रॅमोन फोंटेस नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिकंण्याचा कारनामा रुबेन लिमार्डोने केला होता. यासह,रुबेन लिमार्डो व्हेनेझुएलाचा दुसरा गोल्ड मेडलिस्ट आहे.  

       


​ ​

संबंधित बातम्या