पेनल्टी स्ट्रोक दवडत महिला हॉकीत पराभव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 July 2021

पेनल्टी स्ट्रोक दवडलेल्या भारतीय महिला हॉकी संघास जर्मनीविरुद्ध ०-२ हार पत्करावी लागली. या पराभवामुळे भारतीय संघाच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा दुरावल्या आहेत. उत्तरार्धाच्या सुरुवाीस गुरजीत कौरने हा स्ट्रोक दवडला.

टोकियो / मुंबई - पेनल्टी स्ट्रोक दवडलेल्या भारतीय महिला हॉकी संघास जर्मनीविरुद्ध ०-२ हार पत्करावी लागली. या पराभवामुळे भारतीय संघाच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा दुरावल्या आहेत. उत्तरार्धाच्या सुरुवाीस गुरजीत कौरने हा स्ट्रोक दवडला.

भारतीय महिला संघाने १२ व्या मिनिटास गोल स्वीकारल्यानंतर जर्मनीच्या तोडीस तोड खेळ केला होता, त्याचे फलितच म्हणून ३२ व्या मिनिटास पेनल्टी स्ट्रोक मिळवला होता, पण जर्मनीच्या गोलरक्षिकेने भारतास गोलपासून वंचित ठेवले. तीनच मिनिटांत दुसरा गोल करीत जर्मनीने विजय निश्चित केला. त्यामुळे भारताची बाद फेरी संकटात आली आहे. या पराभवामुळे भारत आता ब गटात तळाला आहे. बाद फेरीसाठी भारतास अव्वल चार संघात स्थान हवे आहे. 

भारताची अद्याप ब्रिटन, आयर्लंड तसेच दक्षिण आफ्रिका या तुलनेत कमकुवत संघाविरुद्धची लढत शिल्लक आहे. भारताची बुधवारी ब्रिटनविरुद्ध लढत आहे. 

भारताचा कोणत्याही प्रकारे प्रभाव पडला नाही. एकमेव पेनल्टी कॉर्नरचे पेनल्टी स्ट्रोकमध्ये केलेले रूपांतर सोडल्यास भारतीय आक्रमकांनी क्वचितच काही साधले. गोलच्या केवळ चार संधी निर्माण केल्या होत्या. एवढेच नव्हे तर गोलक्षेत्रातील प्रवेशातही भारत १०-२० असे कमी पडले.


​ ​

संबंधित बातम्या