धनलक्ष्मीने मोडला P.T. उषाचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 March 2021

धनलक्ष्मीने अंतिम फेरीत स्थान मिळविताना प्राथमिक फेरीत 23.26 सेकंद अशी वेळ दिली आणि उषाने 1998 मध्ये चेन्नई येथील स्पर्धेत नोंदविलेला 23.30 सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. 

नागपूर : शंभर मीटर शर्यतीत द्युतीचंदवर मात करून प्रकाशझोतात आलेल्या तमिळनाडूच्या धनलक्ष्मीने दोनशे मीटरच्या प्राथमिक फेरीत पी. टी. उषाचा 21 वर्षे जुना  विक्रम मोडीत काढला. त्याचप्रमाणे तिने हिमा दासला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. द्युतीचंदने दोनशे मीटर शर्यतीत भाग घेतलेला नाही. धनलक्ष्मीने अंतिम फेरीत स्थान मिळविताना प्राथमिक फेरीत 23.26 सेकंद अशी वेळ दिली आणि उषाने 1998 मध्ये चेन्नई येथील स्पर्धेत नोंदविलेला 23.30 सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. 

INDvsENG ODI Squad : 'सूर्या'ची किरणं वनडेतही दिसणार; कृष्णालाही मिळाली 'प्रसिद्धी'

तिची ही कामगिरी भारतीय महिलांत सार्वकालीन दहावी सर्वोत्तम कामगिरी ठरली. अंतिम शर्यत शुक्रवारी होणार असून हिमा दास यात धनलक्ष्मीवर मात करेल का, हा प्रश्‍न विचारला जात आहे. हिमाच्या नावावर 23.10 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ आहे. महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत प्रथम सहा धावपटूंनी वैयक्तिक सर्वोत्तम वेळेची नोंद केली. यात दिल्लीच्या चंदाने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या ऐश्‍वर्या मिश्राला सहावे आणि दुर्गा देवरेला सातवे स्थान मिळाले. 


​ ​

संबंधित बातम्या