गोळाफेकीत ताजिंदरकडून निराशा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

ऑलिंपिकमध्ये काल थाळीफेकीत कमलप्रीत कौरकडून निराशा झाल्यावर आज गोळाफेरीत ताजिंदरपाल सिंग तूरच्याही पदरीही अपयश आले. तीनपैकी त्याचे दोन प्रयत्न अवैधच ठरले.

टोकियो - ऑलिंपिकमध्ये काल थाळीफेकीत कमलप्रीत कौरकडून निराशा झाल्यावर आज गोळाफेरीत ताजिंदरपाल सिंग तूरच्याही पदरीही अपयश आले. तीनपैकी त्याचे दोन प्रयत्न अवैधच ठरले.

कमलप्रीत कौरप्रमाणे ताजिंदरकडूनही चांगल्या अपेक्षा होत्या, पण पहिल्या प्रयत्नात १९.९९ मीटर लांब गोळा फेकल्यावर पुढच्या दोन प्रयत्नांत त्याने फाऊल केले, त्यामुळे तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. अंतिम फेरीच्या पात्रतेसाठी २१.२० मीटर लांब गोळा फेकणे आवश्यक होते.

आज झालेल्या या शर्यतीत ताजिंदर सुरुवातीला गोळा फेकणार होता. त्याने १९.९९ मीटर अशी कामगिरी केली, पण त्याच्या नंतर येणाऱ्या स्पर्धकांनी जसजसे लांब गोळा फेकण्यास सुरुवात केली तसतसा तजिंदर क्रमवारीत पाठीमागे पडत गेला.

दुसरा राऊंड सुरू झाला तेव्हा ताजिंदर सहाव्या क्रमांकावर होता, परंतु हा राऊंड संपेपर्यंत तो १२ व्या स्थानापर्यंत घसरला. 


​ ​

संबंधित बातम्या