कोरोना महामारीत उत्तेजकाची संधी साधू नका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

ॲथलिट आणि प्रशिक्षकांना अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांचा इशारा

गुरगाव : कोरोना महामारीची संधी साधून जर बंदी असलेली उत्तेजक घेतलीत आणि त्यात दोषी आढळलात, तर थेट बंदीची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा भारतीय ॲथलेटिक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी खेळाडू, तसेच प्रशिक्षकांनाही दिला आहे.

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा पंजाब संघाला मदतीचा हात 

भारतीय ॲथलेटिक्‍स फेडरेशनने निवडणूक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली तिसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्ष निवडून आलेल्या आदिल सुमारीवाला यांनी ॲथलीट आणि प्रशिक्षकांना अस्तित्वाची जाणीव करून दिली. राष्ट्रीय सराव शिबिरात नसलेले अनेक खेळाडू बंदी असलेली उत्तेजक घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कोरोना महामारीमुळे सध्या नाडा (राष्ट्रीय उत्तेजक एजन्सी) उत्तेजक चाचणी करत नाही, परंतु याचा फायदा घेऊन खेळाडू आणि प्रशिक्षकांनी उत्तेजकांचा आसरा घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा सुमारीवाला यांनी दिला.

ख्रिस्टियानो रोनाल्डोने अखेर कोरोनाला मारली 'किक'

काही उत्तेजकांचा अंश प्रदीर्घ काळ शरीरात राहतो, वर्षभरात पुढे कधीही चाचणी झाली तर हे उत्तजेक निश्‍चितच सापडू शकते. सध्या उत्तेजक घेण्याच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे, अजून अशी प्रकरणे सापडली तर भारतावर बंदी येऊ शकते, असे सुमारीवाला यांनी सांगितले. काही जिल्हा आणि राज्यांत प्रशिक्षकच खेळाडूंना उत्तेजक देत असतात हे शासनाचे प्रशिक्षक असतात, आपल्या खेळाडूंनी चांगली प्रगती करावी यासाठी हा प्रयत्न असतो, खेळाडू चमकला की प्रशिक्षकांनाही आर्थिक फायदा होत असतो. या प्रशिक्षकांची नंतर बदलीही होत नसते, असा प्रयत्न देशाच्या ॲथलेटिक्‍ससाठी घातक आहे, असे सुमारीवाला म्हणाले. 

फूड सप्लिमेंटपासूनही सावध
स्थानू बळकट करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी सध्या बाजारात असलेल्या फूड सप्लिमेंटपासूनही सावध राहा, असा इशारा देताना सुमारीवाला यांनी शिबाराबाहेरील कोणतेही पदार्थ घेऊ नका, असा सल्ला ॲथलिट आणि प्रशिक्षकांना दिला आहे.


​ ​

संबंधित बातम्या