कोरोनामुळे एफआयएच प्रो लीगचे सामने स्थगित  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

कोरोनाच्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) एफआयएच प्रो लीगचे आगामी दोन सामने पुढे ढकलले आहेत.

कोरोनाच्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) एफआयएच प्रो लीगचे आगामी दोन सामने पुढे ढकलले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या प्रवासी निर्बंधामुळे एफआयएचने हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवड्यात पुरुषांच्यातील ब्रिटन आणि जर्मनीच्या संघात लढत होणार होती. तर पुढच्या वर्षी जानेवारीत चीन आणि बेल्जियममधील महिला संघात सामना होणार होता.

पुढच्या आठवड्यात ब्रिटन आणि जर्मनीच्या संघांमध्ये सामना आयोजित करण्यात येणार होता. त्यानंतर जागतिक महामारीमुळे जर्मनी, बेल्जियम आणि चीनमध्ये प्रवासावर घालण्यात आलेल्या निर्बधांमुळे एफआयएच हॉकी प्रो लीगमधील सामने तहकूब करण्याचा निर्णय एफआयएचने घेतला असल्याचे जागतिक संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.  

रोहितचा दावा, मी पूर्णपणे तंदुरुस्त 

याशिवाय एफआयएचने जागतिक आरोग्य संकटावर बारकाईने नजर ठेवणार असून, संबंधित संघांच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर या सामन्यांसाठी नवीन तारखांची घोषणा करणार आहे. एफआयएचचे मुख्य अधिकारी थिअरी वेल यांनी अशाप्रकारचे निर्णय घेणे कठीण असते, मात्र सध्याच्या स्थितीनुसार हा निर्णय  या क्षणी सर्वात योग्य असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, एफआयएच हॉकी प्रो लीगचे दुसरे सत्र यावर्षी जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. परंतु महामारीच्या संकटामुळे ही स्पर्धा मे 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.  


​ ​

संबंधित बातम्या