कोरोनामुळे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जानेवारी 2021 पर्यंत स्थगित  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे पुढील महिन्यात होणारी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जानेवारी 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे पुढील महिन्यात होणारी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जानेवारी 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने डिसेंबर महिन्यात होणारी  राष्ट्रीय स्पर्धा नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे  महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी म्हटले आहे.   

हजारो चाहत्यांकडून मॅराडोनास अखेरचा निरोप 

कोरोनाच्या काळामुळे देशातील परिस्थिती ठीक नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीत राष्ट्रीय अजिंक्यपद घेणे शक्य नसल्याचे विनोद तोमर यांनी सांगितले. तसेच पुढच्या वर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस या स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रयत्न विचाराधीन असल्याचे तोमर यांनी नमूद केले. यावर्षी 18 ते 20 डिसेंबरदरम्यान उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा होणार होती. याव्यतिरिक्त पुढील वर्षी नियोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी इतर कोणतेही राज्य तयार असल्यास हे ठिकाण बदलण्याची तयारी असल्याचे देखील तोमर यांनी सांगितले. 

याशिवाय सर्बियातील बेलग्रेड येथे होणाऱ्या वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी ते 12 ते 18 डिसेंबर दरम्यान भारतीय संघ पाठविण्यास तयार असल्याचे विनोद तोमर यांनी यावेळेस अधोरेखित केले आहे. तसेच या स्पर्धेसाठी फेब्रुवारीमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, बजरंग पूनिया (65 किलो), विनेश फोगाट (53 किलो), जितेंद्र कुमार (74 किलो) आणि सोमबीर राठी (2 किलो) यांना बाहेर राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती देखील तोमर यांनी दिली. 

ऑलिम्पिक चाचणी स्पर्धांना मार्चपासून सुरुवात

त्यामुळे, बजरंग, विनेश व सोमबीर हे तिघेही कोणत्याही गटात भाग घेणार नसल्याचे विनोद तोमर यांनी स्पष्ट केले. मात्र नरसिंह यादव 74 किलोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच अंशु मलिक 57 किलोमध्ये आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक 65 किलो गटात प्रवेश करणार असल्याची त्यांनी दिली.     


​ ​

संबंधित बातम्या