महिला हॉकी संघाचे प्रयत्न अपुरे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 August 2021

सामन्यातील अखेरच्या सत्रात भारतीय आक्रमणे त्वेषात सुरू झाली. चेंडू अर्जेंटिनाच्या गोलक्षेत्राच्या आसपासच होता. भारतीय शर्थीचे प्रयत्न करीत होत्या, पण अखेर त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि ऑलिंपिक हॉकी स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

टोकियो / मुंबई - सामन्यातील अखेरच्या सत्रात भारतीय आक्रमणे त्वेषात सुरू झाली. चेंडू अर्जेंटिनाच्या गोलक्षेत्राच्या आसपासच होता. भारतीय शर्थीचे प्रयत्न करीत होत्या, पण अखेर त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि ऑलिंपिक हॉकी स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

भारतास अर्जेंटिनाविरुद्ध नशिबाची पुरेशी साथ नव्हती असे म्हणावे लागेल. तिसऱ्या सत्रातील सहाव्या मिनिटास अर्जेंटिनाने केलेला आघाडीचा गोल संशयास्पद होता. त्या वेळी चेंडू धोकादायकरीत्या उसळल्याचे जाणवले होते, पण रिप्लेमध्ये त्याबाबत नीट काही न दिसल्याने पंचांनी अर्जेंटिनाला संशयाचा फायदा दिला. 

त्यानंतर १७ सेकंद असताना भारताची पेनल्टी कॉर्नरची मागणी फेटाळली गेली आणि आव्हान राखण्याची धूसर संधीही दुरावली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीप्रमाणे गुरजीत कौरने भारतास आघाडीवर नेले, पण अर्जेंटिनाची कर्णधार नोएल बॅर्रीओनुएवो हिचे दोन गोल आणि गोलरक्षिका मारिया सुसी हिचे भक्कम गोलरक्षण यांनी अर्जेंटिनास विजयी केले. भारताने पेनल्टी कॉर्नरवर करीत भारताने घेतली. अर्जेटिनाने प्रतिआक्रमणावर भर देताना डाव्या बगलेतून भारतावर जास्त दडपण आणले.

भारताच्या कडव्या आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही तयार होतो. उपांत्य फेरी गाठलेल्या संघास आम्ही कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. सामन्यात खेळ कसा होतो हे महत्त्वाचे असले तरी विजय त्याहून महत्त्वाचा आहे.
- ऑगस्टिना गॉर्झेलानी, अर्जेंटिनाची खेळाडू

आमच्यासाठी स्पर्धा संपलेली नाही. अजूनही आम्हाला पदक जिंकण्याची संधी आहे. आता वेगळा दृष्टिकोन बाळगून तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीसाठी आम्ही उतरणार आहोत. ऑलिंपिक पदक कोणतेही असले तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. सुवर्ण जिंकले असते तर चांगलेच होते, पण ब्राँझही काही कमी महत्त्वाचे नाही. 
- राणी रामपाल, भारताची कर्णधार


​ ​

संबंधित बातम्या