बांगलादेश नेमबाजी स्पर्धेत एल्वेनीलला सुवर्ण, शाहुला रौप्य 

संजय घारपुरे
Monday, 19 October 2020

बांगलादेश नेमबाजी क्रीडा महासंघाने घेतलेली ही स्पर्धा ऑनलाईन होती. त्यात सहा देशांतील नेमबाजांचा सहभाग होता. साठ शॉटस्‌च्या या स्पर्धेत एल्वेनील हिने 627.5 गुणांचा वेध घेत अव्वल क्रमांक मिळवला. तिने शिओरी हिराता (622.6) आणि विद्या तोय्यिबा (621.1) यांना सहज मागे टाकले. 

मुंबई : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या एल्वेनील वलाररिवान हिने शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेत शाहू माने याने रौप्यपदकाचा वेध घेतला. एल्वेनीलने एक हजार डॉलरचे तर शाहूने सातशे डॉलरचे बक्षीस जिंकले. 

नेमबाजांच्या शिबिरास आता 15 चा मुहूर्त

बांगलादेश नेमबाजी क्रीडा महासंघाने घेतलेली ही स्पर्धा ऑनलाईन होती. त्यात सहा देशांतील नेमबाजांचा सहभाग होता. साठ शॉटस्‌च्या या स्पर्धेत एल्वेनील हिने 627.5 गुणांचा वेध घेत अव्वल क्रमांक मिळवला. तिने शिओरी हिराता (622.6) आणि विद्या तोय्यिबा (621.1) यांना सहज मागे टाकले. 

टी -20 क्रिकेटबाबत गावस्करांनी सुचवला पर्याय ; गोलंदाजांवरील दबाव कमी होणार? 

जपानच्या नाओया ओकादा याने भारताच्या शाहू माने याला मागे टाकत पुरुषांच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. शाहू 623.8 गुणांचा वेध घेत असताना नाओया याने 630.9 गुणांची कमाई केली. बांगलादेशचा बकी अब्दुल्ला हेल (617.3) यांना सहज मागे टाकले. या स्पर्धेत इंडोनेशिया, कोरिया आणि भूतानचाही सहभाग होता.

​ ​

संबंधित बातम्या