टोकियोतील निवडणुकीमुळे ऑलिंपिक संयोजन खडतर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा तीन आठवड्यांवर असताना झालेल्या टोकियो नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे स्पर्धा संयोजनाचा सुरळीत मार्ग खडतर झाला असल्याचे मानले जात आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा तीन आठवड्यांवर असताना झालेल्या टोकियो नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे स्पर्धा संयोजनाचा सुरळीत मार्ग खडतर झाला असल्याचे मानले जात आहे. 

रविवारी १२७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात सध्या सत्तेवर असलेल्या युरोको कोईके यांच्या तोमिन फर्स्ट पक्षास ३१ जागांवर यश लाभले. गेल्या निवडणुकीत त्यांनी ४६ जागा जिंल्या होत्या. जपानमध्ये सत्ताधारी असलेल्या लिबरल डेमॉक्रॅट्सने २५ वरून ३३ पर्यंत प्रगती केली. ऑलिंपिक स्पर्धा नकोच, अशी ठाम भूमिका घेतलेल्या कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवरच यश लाभले.

या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या सर्वेक्षणात ६० टक्के लोकांनी विरोध केल्याचे सांगितले जात आहे. मात्र आत्ता ऑलिंपिक स्पर्धा घेण्याची गरज काय, अशी भूमिका घेतलेल्या डेमॉक्रॅटस् पक्षाच्या जागा ८ वरून १५ झाल्या. जपानमध्ये सत्ताधारी असलेल्या लिबरल डेमॉक्रॅटस्ने सुरक्षित स्पर्धा संयोजनावर भर दिला होता. कोईके यांच्या सत्ताधारी पक्षाने स्पर्धा प्रेक्षकांविना यासाठी आग्रह धरला होता. या निवडणुकीसाठी टोकियोतील एकूण १ कोटी ४० लाख लोकसंख्येपैकी ९८ लाख व्यक्ती मतदानास पात्र होत्या. 

त्यांचे लसीकरण जास्त
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जपानमध्ये १५ हजार खेळाडू आणि ५० हजार अधिकारी येतील. त्याचबरोबर ७० हजार स्वयंसेवक असतील. या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. या परिस्थितीत टोकियोतील लसीकरण झालेल्या नागरिकांपेक्षा ऑलिंपिकसाठी आलेल्यांची संख्या जास्त असेल, अशी खोचक टिप्पणीही होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या